टाटा मेमोरियल हॉस्पीटलमध्ये विविध पदांच्या 52 जागा

 

टाटा मेमोरियल हॉस्पीटलमध्ये विविध पदांच्या 52 जागा
टाटा मेमोरियल सेंटरच्या एडव्हान्स सेंटर फॉर ट्रीटमेंट रिसर्च अॅण्ड एज्युकेशन इन कॅन्सर, खारघर, नवी मुंबई येथे विविध पदांच्या 52 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

पदांचा तपशील व शैक्षणिक पात्रता 
डेप्युटी कंट्रोलर ऑफ अकाउंट (1 जागा) : अर्हता- वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवी/लेखा अधिकारी म्हणून 10 वर्षाचा अनुभव किंवा एम.बी.ए./एफ.सी.ए./आयसीडब्लुएआय आणि वित्तीय संस्थेतील 8 वर्षाचा अनुभव. वयोमर्यादा- 40 वर्षे

इंजीनियर सी- (1 जागा) : अर्हता- स्थापत्य अभियांत्रिकी विषयातील बी.ई./बी.टेक. 55% गुणांसह उत्तीर्ण. वयोमर्यादा- 35 वर्षे

असिस्टंट एडमिनीस्ट्रेटिव्ह ऑफीसर- (एचआर-1 जागा), अर्हता- पदवीधर तसेच पदव्युत्तर पदवी / पदविका (एचआरए). वयोमर्यादा- 35 वर्षे 

असिस्टंट अकाउंट ऑफीसर- (1 जागा), अर्हता- आयसीडब्लुएआय/एफसीए/एमबीए (वित्त) किंवा वाणिज्य शाखेतील पदव्युत्तर पदवी, वयोमर्यादा- 35 वर्षे

असिस्टंट परचेस ऑफीसर-(1 जागा), अर्हता- कोणत्याही शाखेतील पदवी आणि पदव्युत्तर पदवी/ पदवीका (मटेरियल मॅनेजमेंट), वयोमर्यादा-35 वर्षे 

नर्स : (37 जागा), अर्हता- 2 वर्षे अनुभवासह बी.एस.सी. (नर्सिंग), वयोमर्यादा-30 वर्षे

सायंटिफीक असिस्टंट बी- (1 जागा) : अर्हता- 55% गुणांसह न्युक्लीयर मेडीकल टेक्नॉलॉजीसह बी.एस्सी आणि एक वर्ष न्युक्लीयर मेडीसीनचा अनुभव, वयोमर्यादा-30 वर्षे

नेटवर्कींग टेक्नीशियन सी -(2 जागा) : अर्हता- डिप्लोमा इन इलेक्ट्रॉनिक एण्ड कॉम्प्युटर इंजीनियरींग (12+3), वयोमर्यादा-30 वर्षे.

टेक्नीशियन सी- (3 जागा) : अर्हता- 12 वी आणि मान्यताप्राप्त संस्थेतील डी.एम.एल.टी, वयोमर्यादा-30 वर्षे

स्टेनोग्राफर- (2 जागा) : अर्हता- 12 वी एमएस-सीआयटीसह, शॉर्ट हॅण्ड आणि टायपिंग 80/40, वयोमर्यादा-30 वर्षे

टेक्नीशीयन ए-(2 जागा) : अर्हता- एसएससी किंवा 2 वर्षे प्लंम्बिंगचा दोन वर्षांचा आयटीआयचा कोर्स, वयोमर्यादा-27 वर्षे

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 ऑगस्ट 2017

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs