पशुसंवर्धन विभागात विविध पदाच्या 138 जागा

 

पशुसंवर्धन विभागात विविध पदाच्या 138 जागा
महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात पशुसंवर्धन पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपीक, लिपिक टंकलेखक, लघुलेखक उच्चश्रेणी, लघुलेखक निम्नश्रेणी, वाहनचालक या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

पशुसंवर्धन पर्यवेक्षक 114 जागा
शैक्षणिक पात्रता : दहावी परीक्षा उत्तीर्ण, पशुधन पर्यवेक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण.

वरिष्ठ लिपीक 10 जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी

लिपीक टंकलेखक 7 जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, मराठी 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि. वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण

लघुलेखक उच्च श्रेणी 1 जागा
शैक्षणिक पात्रता : दहावी परीक्षा उत्तीर्ण, इंग्रजी व मराठी 120 श.प्र.मि. लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण, मराठी 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि. वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.

लघुलेखक (निम्नश्रेणी) 1 जागा
शैक्षणिक पात्रता : दहावी परीक्षा उत्तीर्ण, इंग्रजी व मराठी 100 श.प्र.मि. लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण, 

वाहनचालक 5 जागा
शैक्षणिक पात्रता : दहावी परीक्षा उत्तीर्ण, वाहन चालविण्याच्या परवान्यासह 3 वर्षाचा अनुभव.

वयोमर्यादा : पदनिहाय वयोमर्यादेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 जुलै 2017

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs