महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिक्षक पात्रता परीक्षा 2017 mahatet.in

 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे शिक्षक पात्रता परीक्षा 2017
महाराष्ट्र राज्य परीक्षा परीषद, पुणे यांच्या वतीने दिनांक 22 जुलै 2017 रोजी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा आयोजीत करण्यात आली आहे. भविष्यात होणा-या शिक्षकभरतीसाठी हि परीक्षा उत्तीर्ण असणे गरजेचे असल्याने आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक अहर्ता : 
इयत्ता पहिली ते पाचवीकरिता
मान्यता प्राप्त मंडळाची किमान 50 टक्के गुणांसह उच्च माध्यमिक (किंवा समकक्ष) परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची प्राथमिक शिक्षणशास्त्र दोन वर्षाची पदविका (D.T.ED) उत्तीर्ण (त्यास कोणतेही नाव दिले असो)

इयत्ता 6 वी ते 8 वी करिता
मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि मान्यताप्राप्त संस्थेची प्राथमिक शिक्षणशास्त्र दोन वर्षाची पदविका उत्तीर्ण (त्यास कोणतेही नाव दिले असो) 

परीक्षा शुल्क : सर्वसाधारण, इ.मा.व., वि.मा.प्र. व वि.जा.भ.ज. 
फक्त पेपर-1 किंवा पेपर-2 - 500 रू.  - पेपर-1 व पेपर-2 800 रू.
अनु.जाती, अनु.जमाती व अपंग (Differently Abled Person)
फक्त पेपर-1 किंवा पेपर-2  250 रू. - पेपर-1 व पेपर-2 400 रू.


आराखडा 
शिक्षक पात्रका परीक्षा (Teacher Eligibility Test) मध्ये कनिष्ठ प्राथमिक (इ. 4 ली ते 5 वी) व वरिष्ठ प्राथमिक (इ.6 वी ते 8 वी) या दोन गटातील शिक्षकांसाठी प्रत्येकी एक स्वतंत्र प्रश्नपत्रिका राहतील. दोन्ही गटासाठी अर्ज करणा-या उमेदवारास दोन्ही प्रश्नपत्रिका आवश्यक राहील. 

या दोन्ही प्रश्नपत्रिकेचे स्वरुप व काठिण्य पातळी अनुक्रमे माध्यमिक व उच्च माध्यमिक शालेय अभ्यासक्रमावर आधारित राहील. 

पात्रता गुण 
या परीक्षेमध्य़े किमान 60 टक्के गुण प्राप्त करणा-या उमेदवारास (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जाती/जमाती, विशेष मागासप्रवर्ग, इतर मागासप्रवर्ग आणि अपंग उमेदवारांना 55 टक्के) उत्तीर्ण समजण्यात येईल.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 जुन 2017

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs