मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमांतर्गत पदविधरांसाठी सुवर्णसंधी

 

मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमांतर्गत पदविधरांसाठी सुवर्णसंधी
महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनामध्ये युवकांचा सहभाग मिळविण्यासाठी मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची घोषणा केलेली आहे. 
युवकांचा उत्साह, नाविन्यपूर्ण दृष्टीकोन व तंत्रज्ञानातील त्यांची गती यांचा प्रशासनास उपयोग व्हावा हा या कार्यक्रमाचा उद्देश. सोबतच युवकांनाही शासनासोबत काम करण्याचा अनोखा अनुभव या कार्यक्रमामुळे मिळेल. सामाजिक विकास क्षेत्रात रस असणाऱ्या युवकांना अत्यंत उपयुक्त अनुभव देण्याच्या उद्देशाने मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रमाची रचना करण्यात आलेली आहे. तरुणांमधील नेतृत्त्व गुण जोपासणे, त्यांचे प्रशासनासंदर्भातील ज्ञान वृद्धिंगत करणे, भविष्यातील नेतृत्त्वाच्या मोठ्या संधींसाठी युवकांना तयार करणे यासाठी कार्यक्रमाची आखणी केलेली आहे. 
मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम 2017 अंतर्गत शासकीय सेवा गट अ समकक्ष पदाच्या 50 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. 


शैक्षणिक अहर्ता : दिनांक 1 एप्रील 2017 रोजी कोणत्याही शाखेतील पदवीधर (किमान 60 टक्के गुण) उच्च शिक्षणास प्राधान्य

वयोमर्यादा : दिनांक 1 एप्रील 2017 रोजी किमान 21 व कमाल 26 वर्ष (अधिक माहितीसाठी जाहिरात पाहा.)

परीक्षा शुल्क : 500 रू.

फेलोशिप नियुक्ती कालावधी : 11 महिने
विद्यावेतन : या कार्यक्रमांतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 35000 रू विद्यावेतन व 5000 रू दरमहा प्रवासखर्च देण्यात येईल

लाभ
1) शासकीय सेवेतील गट अ अधिकाऱ्याच्या समकक्ष दर्जा
2) फेलोशिपच्या कार्यकाळात कार्यालयीन वापराकरिता ओळखपत्र व इमेल आयडी
3) दरमहा रु. 35,000 विद्यावेतन तसेच प्रवास व अनुषंगिक खर्चासाठी दरमहा ठोक रु. 5000
4) फेलोशिपच्या कार्यकाळात एकूण 10 दिवसांची किरकोळ रजा
5) फेलोशिपच्या कार्यकाळासाठी अपघात विम्याचे संरक्षण

6) 11 महिन्यांचा कार्यकाळ यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना प्रशस्तीपत्र


ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जुन 2017

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs