मत्स्यव्यवसाय विभागात विविध पदांच्या 50 जागा

 

मत्स्यव्यवसाय विभागात विविध पदांच्या 50 जागा
आयुक्त मत्स्यव्यवसाय यांच्या मुंबई, सर्व प्रादेशिक व जिल्हा कार्यालयातील सहायक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी (38 जागा), यांत्रिकी निदेशक (02 जागा), सांख्यिकी सहायक (03 जागा), कनिष्ठ लिपिक/ वसुली सहायक/रोखपाल/मत्स्यक्षेत्र प्रगणक/लिपिक-नि-टंकलेखक (07 जागा) अशा एकूण 50 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : 
1) सहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी - मत्स्यविज्ञान विषयातील पदवी
2 यांत्रिकी निदेशक - आय.टी.आय. पाच वर्षाच्या अनुभवासह अथवा डिझेल मेकेनिक पदवीधारक
3) सांख्यिकी अधिकारी - मान्यताप्राप्त विद्यापीठाची सांख्यिकी, गणित अथवा अर्थशास्त्र विषयाची सांख्यिकी विषयासह पदवी
4) लिपिक - एस.एस.सी., टायपिंग मराठी 30 व इंग्रजी 40 श.प्र.मि.
पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.

वयोमर्यादा : दि. 1/12/2016 रोजी किमान 18 व कमाल 38 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शासन निर्णयानुसार शिथिलक्षम)

परिक्षा शुल्क : सर्वसाधारण प्रवर्ग 300 रू. मागास प्रवर्ग 150 रू.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 14 जानेवारी 2017 

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs