जालना जिल्हाधिकारी कार्यालयात विविध पदांच्या 76 जागा

 

Maharashtra Government Jobs
जालना जिल्हाधिकारी कार्यालयात विविध पदांच्या 76 जागा
जालना जिल्हाधिकारी कार्यालयात महाराष्ट्र नगरपरिषद सेवा नगर अभियंता / पर्यवेक्षक (17 जागा), महाराष्ट्र नगरपरिषद पाणीपुरवठा, मलनिस्सारण व स्वच्छता पर्यवेक्षक अभियांत्रिकी सेवा (4 जागा), लेखापरिक्षण व लेखा सेवा सहायक लेखा पर्यवेक्षक/सहायक लेखापाल (2 जागा), अग्निशमन स्थानक पर्यवेक्षक सेवा (6 जागा), कर निर्धारण व प्रशासकीय सेवा (3 जागा), लघुटंकलेखक (2 जागा), लिपीक टंकलेखक (4 जागा), स्वच्छता निरिक्षक (9 जागा), वाहनचालक कम ऑपरेटर (7 जागा), सहायक उद्यान पर्यवेक्षक (3 जागा), आरोग्य सहायक /नर्स (2 जागा), गाळणी चालक/प्रयोगशाळा सहायक (3 जागा), पंप ऑपरेटर (1 जागा), तारतंत्री (2 जागा), फायरमन (11 जागा) अशा एकूण 76 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक अहर्ता : संबंधीत अभियांत्रिकी शाखेत बि.ई./डि.ई.(डिप्लोमा), पदवीधर, अग्निशमन कोर्स, टायपिंग, लघुलेखन, एस.एस.सी, एम.एस.सी.आय.टी. फायरमन, नर्सिंग कोर्स, आय.टी.आय. वाहनचालक परवाना. पदनिहाय शैक्षणिक अहर्तेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.

वयोमर्यादा :
दि.27 डिसेंबर 2016 रोजी किमान 18 व कमाल 38 (राखीव प्रवर्गासाठी शासन निर्णयानुसार शिथिलक्षम)
परीक्षा शुल्क : सर्वसाधारण - 300 रू. मागास प्रवर्ग - 150 रू.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 11 जानेवारी 2017

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs