MAHATET 2015 महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2015

 

MAHATET 2015 महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2015
3.5 Lakh Salary Jobs In Private Banks
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या कडून महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-2015 करिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
शैक्षणिक अर्हता : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 च्या तरतूदी लक्षात घेता, राज्यामध्ये इथून पुढे सर्व प्राथमिक शिक्षकांसाठी (इयत्ता 1 ली ते 8 वी करिता) खालीलप्रमाणे किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व शिक्षक पात्रता परीक्षा अनिवार्य करण्यात येत आहे. 
1.1) इयत्ता पहिली ते पाचवीकरिता:- 
अ) शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता- 
(i) मान्यता प्राप्त मंडळाची किमान 50 टक्के गुणांसह उच्च माध्यमिक (किंवा समकक्ष) परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची प्राथमिक शिक्षणशास्त्र दोन वर्षाची पदविका (D.T.ED) उत्तीर्ण (त्यास कोणतेही नाव दिले असो) 
किंवा 
(ii) राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या (National Council for Teacher Education) (Regulations, Norms and Procedure), Regulations, 2002 नुसार मान्यता प्राप्त मंडळाची किमान ४५ टक्के गुणांसह उच्च माध्यमिक (किंवा समकक्ष) परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची प्राथमिक शिक्षणशास्त्र दोन वर्षाची पदविका उत्तीर्ण (त्यास कोणतेही नाव दिले असो). 
किंवा 
(iii) मान्यता प्राप्त मंडळाची किमान 50 टक्के गुणांसह उच्च माध्यमिक (किंवा समकक्ष) परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची, चार वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदवी (Bachelor of Elementary Education) उत्तीर्ण 
किंवा 
(iv) मान्यता प्राप्त परीक्षा मंडळाची किमान 50 टक्के गुणांसह उच्च माध्यमिक (किंवा समकक्ष) परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची शिक्षणशास्त्र विषयात दोन वर्षाची पदविका (विशेष शिक्षण) 
किंवा 
(v) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि मान्यताप्राप्त संस्थेची शिक्षणशास्त्र दोन वर्षाची पदविका उत्तीर्ण (त्यास कोणतेही नाव दिले असो), 
(vi) शासन निर्णय शालेय शिक्षण व क्रिडा विभाग क्रमांक टसीएम-2009/36/09/माश-4, दि. 10 जून, 2010 अन्वये उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (MCVC) शाखेअंतर्गत कृषी गटातील Horticulture and Crop Science आणि आरोग्य वैद्दकिय सेवागटातील Crench and Pre School Management परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यता प्राप्त संस्थेची शिक्षण शास्त्रात दोन वर्षाची पदविका 
ब) शिक्षक पात्रता परीक्षा ( TET) 
राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद, (NCTE) यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार केंद्र शासन किंवा महाराष्ट्र शासनाद्वारे आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा (Teacher Eligibility Test) उत्तीर्ण. 
1.2) इयत्ता 6 वी ते 8 वी करिता- 
अ) शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता- 
(i) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आणि मान्यताप्राप्त संस्थेची प्राथमिक शिक्षणशास्त्र दोन वर्षाची पदविका उत्तीर्ण (त्यास कोणतेही नाव दिले असो) 
किंवा 
(ii) राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेच्या (National Council for Teacher Education) (Regulations, Norms and Procedure), Regulations, 2002 नुसार मान्यताप्राप्त विद्यापिठाची किमान ४५ टक्के गुणांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त संस्थेची शिक्षणशास्त्र विषयातील एक वर्षाची पदवी (Bachelor in Education) उत्तीर्ण (त्यास कोणतेही नाव दिले असो) 
किंवा 
(iii) मान्यता प्राप्त परीक्षा मंडळाची किंमान 50 टक्के गुणांसह उच्च माध्यमिक (किंवा समकक्ष) परीक्षा उत्तीर्ण आणि चार वर्षाची प्राथमिक शिक्षणशास्त्र पदवी (Bachelor of Elementary Education) उत्तीर्ण 
किंवा 
(iv) मान्यताप्राप्त परीक्षा मंडळाची किंमान 50 टक्के गुणांसह उच्च माध्यमिक (किंवा समकक्ष) परीक्षा उत्तीर्ण आणि चार वर्षाची B.A./B.Sc.Ed. or B.A.Ed./B.Sc.Ed. उत्तीर्ण 
किंवा 
(v) मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किमान ५० टक्के गुणांसह उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची एक वर्षाची B.Ed. (Special Education) पदवी उत्तीर्ण. 
किंवा 
(vi) कृषी गटातील Horticulture and Crop Science आणि आरोग्य वैद्यकीय सेवा गटातील Crench and Pre School Management मधील पदवी परीक्षा उत्तीर्ण आणि मान्यताप्राप्त विद्यापीठाची शिक्षणशास्त्रातील एक वर्षाची पदवी. 
आणि 
ब) शिक्षक पात्रता परीक्षा (T.E.T) 
राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषद (NCTE) यांच्या मार्गदर्शक तत्वानुसार केंद्र शासन किंवा महाराष्ट्र शासनाद्वारे आयोजित शिक्षक पात्रता परीक्षा (Teacher Eligibility Test) उत्तीर्ण.  

महत्त्व :
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम, 2009 मधील तरतूदीनुसार इथून पुढे सर्व प्राथमिक शिक्षकांकरिता (इ. 1 ली ते 8 वी) “शिक्षक पात्रता परीक्षा (Teacher Eligibility Test) अनिवार्य करण्यात येत आहे. 
ही बाब प्राथमिक शिक्षण (इ. 1 ली ते 8 वी) देणा-या सर्व शाळांमध्ये (सर्व व्यवस्थापन, सर्व माध्यम, सर्व परीक्षा मंडळे, अनुदानित/विना अनुदानित/कायम विना अनुदानित इ.) सर्व शिक्षकांना लागू राहील.

पात्रता गुण 
या परीक्षेमध्य़े किमान 60 टक्के गुण प्राप्त करणा-या उमेदवारास (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या विमुक्त जाती/जमाती, विशेष मागासप्रवर्ग, इतर मागासप्रवर्ग आणि अपंग उमेदवारांना 55 टक्के) उत्तीर्ण समजण्यात येईल.

शिक्षक पात्रका परीक्षा (Teacher Eligibility Test) मध्ये कनिष्ठ प्राथमिक (इ. 1 ली ते 5 वी) व वरिष्ठ प्राथमिक (इ.6 वी ते 8 वी) या दोन गटातील शिक्षकांसाठी प्रत्येकी एक स्वतंत्र प्रश्नपत्रिका राहतील. दोन्ही गटासाठी अर्ज करणा-या उमेदवारास दोन्ही प्रश्नपत्रिका आवश्यक राहील. 
या दोन्ही प्रश्नपत्रिकेचे स्वरुप व काठिण्य पातळी अनुक्रमे माध्यमिक व उच्च माध्यमिक शालेय अभ्यासक्रमावर आधारित राहील. 

परीक्षा शुल्क 
सर्वसाधारण, इ.मा.व., वि.मा.प्र. व वि.जा.भ.ज. फक्त पेपर - 1 किंवा पेपर - 2 : रू. 500/-
पेपर - 1 व पेपर - 2 : रू. 800/-
अनु.जाती, अनु.जमाती व अपंग (Differently abled person) फक्त पेपर - 1 किंवा पेपर - 2  : रू. 250/-
पेपर - 1 व पेपर - 2 : रू. 400/-
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 नोव्हेंबर 2015

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs