महाराष्ट्रात 20 हजार पोलीसांची भरती नोव्हेंबरमध्ये Maharashtra Police Recruitment 2015

 


मित्रांनो बहुप्रतिक्षीत पोलीस भरती येत्या नोव्हेंबर महिन्यात होणार असे स्पष्ट संकेत खुद्द राज्याच्या गृह राज्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे सर्व अफवांना अखेर विराम मिळाला असुन भरतीची तयारी 
करणा-यांना हि आनंदाची बातमी आहे. 
शिवाय सुमारे 20 हजार जागांसाठी हि भरती होणार आहे. त्यामुळे अनेकांना या संधीचे सोने करता येईल.
मित्रांनो म्हणजे तुमच्या हातात आता केवळ 2-3 महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे लगेच तयारीला लागा. 
पोलीस भरतीची जाहिरात येताच नोकरी मार्गदर्शन वर त्याची माहिती आम्ही देऊच. तोवर लागा तयारीला !


२0 हजार पोलीस भरती होणार : गृह राज्यमंत्री प्रा. राम शिंदे 
दौंड : राज्यात येत्या नोव्हेंबरअखेर २0 हजार पोलिसांची भरती केली जाणार असल्याची माहिती गृह राज्यमंत्री प्रा. राम शिंदे यांनी नानवीज (ता. दौंड) येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. या संदर्भात सोशल मीडियावरून जी चुकीची माहिती पसरवली जात आहे, त्या अफवांवर विश्‍वास ठेवू नका, असे आवाहनही शिंदे यांनी केले. 
वाढती लोकसंख्या आणि त्यातच बदलत्या गुन्हेगारीच्या पार्श्‍वभूमीवर लोकसंरक्षणासाठी पोलीस प्रशिक्षण केंद्रात पोलिसांना अत्याधुनिक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पोलीसभरती संदर्भात व्हॉट्सअँप, फेसबुक या सोशल मीडियावर चुकीचे संदेश दिले जात आहेत. 'पोलीसभरती होणार आहे. जागा निघाल्यात,' अशा या चुकीच्या संदेशामुळे समाजाची दिशाभूल होत आहे. तरी, सोशल मीडियावर येणार्‍या पोलीसभरती संदर्भातील संदेशाकडे दुर्लक्ष करणे गरजेचे असून, त्याबाबत शासनामार्फत योग्य ती माहिती दिली जाईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs