MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे लिपीक-टंकलेखक पदांची महाभरती

 

महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे लिपीक-टंकलेखक पदांची महाभरती
महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्यावतीने राज्य शासनाच्या मंत्रालयीन प्रशासकीय विभाग व बृहन्मुंबईतील विविध कार्यालयातील लिपीक-टंकलेखक -मराठी व इंग्रजी गट-क 1435 जागा या पदासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.


कसा करायचा या परीक्षेचा अभ्यास? 
कोणती आहेत पुस्तके? अभ्यासक्रम काय आहे? 
या माहितीसाठी येथे क्लिक करा !

एकुण पदसंख्या : 1435
मंत्रालयीन प्रशासकीय विभाग (283 पदे)
मराठी टंकलेखक 255 जागा, इंग्रजी टंकलेखक 28 जागा

बुहन्मुंबई अंतर्गत विवीध कार्यालये (1152 पदे)
मराठी टंकलेखक 1117 पदे, इंग्रजी टंकलेखक 35 पदे
Free Career Tips, Interview Guidance & GK

शैक्षणिक अहर्ता : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण अथवा समकक्ष अहर्ता.
लिपिक टंकलेखक (मराठी) पदासाठी मराठी टंकलेखनाचा वेग 30 श.प्र.मि. व लिपिक टंकलेखक (इंग्रजी) पदासाठी इंगजी टंकलेखनाचा वेग 40 श.प्र.मि.
वयोमर्यादा : दिनांक 1 नोव्हेंबर 2015 रोजी किमान 18 व कमाल 33 वर्ष (उच्च वयोमर्यादा राखीव प्रवर्गासाठी शासननिर्णयानुसार शिथिलक्षम)
आवेदन शुल्क : अमागास रू.515, मागासवर्गीय रू. 315, माजी सैनिक रू. 15
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 जुलै 2015

No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs