बार्टी अंतर्गत संपुर्ण महाराष्ट्रात समन्वयक व सहाय्यक पदाच्या 400 जागा

 

बार्टी अंतर्गत संपुर्ण महाराष्ट्रात समन्वयक 
व सहाय्यक पदाच्या 400 जागा 
बार्टी, पुणे अंतर्गत तालुका समन्वयक पदाच्या 200 जागा
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे अंतर्गत मानधन तत्त्वावर करार पद्धतीने तालुका समन्वयक (200 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. विभागनिहाय जागा पुढीलप्रमाणे - कोकण(28 जागा), पुणे (35 जागा), नाशिक (30 जागा), औरंगाबाद (44 जागा), अमरावती (30 जागा), नागपूर (33 जागा). 
निवड केलेल्या उमेदवारांना “तालुका समन्वयक” म्हणून करार पध्दतीने मानधन तत्त्वावर 11 महिन्यांसाठी कामावर ठेवण्यात येईल व त्यांना जिल्ह्याचे संबंधित सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्या प्रशासकीय सनियंत्रणाखाली काम करावे लागणार आहे.
मानधन : रु. 25,000/- प्रति महिना. त्याशिवाय अनुज्ञेय प्रवासखर्च. 
शैक्षणिक अहर्ता : कोणत्याही शाखेत पदव्युत्तर (Post Graduate in any stream) किंवा 
B.E. किंवा B.Tech. किंवा Rural Management मध्ये PGDM किंवा PGDBM. 
वयोमर्यादा : दिनांक 13 जुलै, 2015 रोजी वय 46 वर्षापेक्षा जास्त असू नये.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 जुलै 2015

बार्टी, पुणे अंतर्गत कार्यालयीन सहाय्यक पदाच्या 200 जागा
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या विविध योजनांची, उपक्रमांची व कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणीसाठी आवश्यक सर्व क्षेत्रीय व कार्यालयीन काम करण्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे अंतर्गत मानधन तत्त्वावर करार पद्धतीने कार्यालयीन सहाय्यक (200 जागा) या पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. विभागनिहाय जागा पुढील प्रमाणे - कोकण(28 जागा), पुणे (35 जागा), नाशिक (30 जागा), औरंगाबाद (44 जागा), अमरावती (30 जागा), नागपूर (33 जागा). 
निवड केलेल्या उमेदवारांना ‘कार्यालयीन सहाय्यक’ म्हणून करार पध्दतीने मानधन तत्त्वावर 11 महिन्यांसाठी कामावर ठेवण्यात येईल व त्यांना जिल्ह्याचे संबंधित सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांच्या प्रशासकीय सनियंत्रणाखाली काम करावे लागणार आहे.
मानधन : रु. 10,000/- प्रति महिना. त्याशिवाय अनुज्ञेय प्रवासखर्च.
शैक्षणिक अहर्ता : 1. किमान एस.एस.सी. (इयत्ता 10 वी) उत्तीर्ण. 2. जी.सी.सी. मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि. परीक्षा उत्तीर्ण 3. MSCIT उत्तीर्ण
वयोमर्यादा : दिनांक 13 जुलै, 2015 रोजी वय 46 वर्षापेक्षा जास्त असू नये.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 13 जुलै 2015 तुमच्या शैक्षणिक योग्यतेनुसार मिळवा लगेच नोकरी
विवीध खासगी, निमशासकीय कार्यालयात हजारो पदे

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs