पोलीस भरती ईच्छुकांसाठी आनंदाची बातमी !

 

पोलीस भरती साठी ईच्छुक असलेल्या तरूण तरूणींना मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. यापुढे होणा-या पोलीस भरती पुरुषांना 1600 मीटर, तर महिलांना 800 मीटर अंतर धावावं लागणार आहे. यापूर्वी पुरुषांना 5 किलोमीटर, तर महिलांना 3 किलोमीटर धावावं लागत होतं. यासंदर्भात राज्यसरकारनं मुंबई उच्च न्यायालयात स्पष्टीकरण दिले आहे.
गेल्या वर्षी झालेल्या पोलीस भरती दरम्यान पाच जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. यासंदर्भात सामाजीक संस्था ‘ऑल महाराष्ट्र ह्यूमन राइट्स असोसिएशन’च्या पत्राची हायकोर्टाने दखल घेतली. त्यानंतर सोमवारी झालेल्या सुनावणीत सरकारनं कोर्टापुढे ही माहिती सादर केली. कोर्टान दिलेल्या आदेशाप्रमाणे पोलिस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने पोलिस भरतीदरम्यान धावावं लागणारं अंतर कमी करण्याचा निर्णय घेतला. सरकारच्या या निर्णयावर कोर्टाने समाधान व्यक्त केलं.
शासनाच्या या निर्णयामुळे पोलीस सेवेत येण्यास ईच्छुक असलेल्या अनेकांच्या आशा पल्लवीत झाल्या असुन लवकरच बहुप्रतिक्षीत पोलीस भरती होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


टिप : मित्रांनो, WhatsApp & Facebook वर सध्या पोलीस भरती संदर्भातील जाहिरात पोस्ट केल्या जात आहे. मात्र हि जाहिरात खोटी असुन पोलीस भरती ची कोणतीही जाहिरात पोलीस विभागाकडून प्रसिद्ध करण्यात आलेली नाही.

केवळ 6 महिन्यांच्या कोर्ससह लगेच नोकरीची संधी
Eligibility : BA (Economics or Statistics), B.SC (Maths), B.com, BE/B.tech, BBA/BCA/BMS 
Apply Now For Free Information

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs