20 राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये IBPS द्वारे हजारो पदांची भरती

 

26 राष्ट्रीयीकृत बँकापैकी 20 बँकांमधील ( स्टेट बँक ऑफ इंडिया व त्यांच्या सहयोगी बँका आदी वगळून ) प्रोबेशनरी ऑफिसर व मॅनेजमेंट ट्रेनी पदासाठी एकच सामायिक लेखी परीक्षा दरवर्षी घेतली जाते . यावर्षी 20 राष्ट्रीयीकृत बँकांबरोबरीनेच अन्य बँका व वित्त संस्थासाठीदेखील ही परीक्षा ग्राह्य धरली जाणार आहे . सामायिक लेखी परीक्षेसाठी प्रवेश अर्ज संस्थेच्या (www.ibps.in) वेबसाइटवर ऑनलाइन भरावे लागतील . 

ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची मुदत - 22 जुलै ते 17 ऑगस्ट 2013 

लेखी परीक्षा ( ऑनलाइन ) - 19 , 20 , 26 , 27 ऑक्टोबर 2013 

वयोमर्यादा - किमान : 20 वर्षे , कमाल : 28 वर्षं 
( अनुसूचित जाती / जमातींसाठी कमाल वयोमर्यादा 33 वर्षे , तर ओबीसींसाठी 31 वर्षे इतकी आहे .) 

शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी परीक्षेत खुल्या गटातील उमेदवारासाठी किमान 60 टक्के गुण आवश्यक तर राखीव वर्गातील उमेदवारांसाठी 55 टक्के गुण आवश्यक आहेत . 
लेखी परीक्षा ऑनलाइन ( कम्प्युटराइज्ड ) घेतली जाईल . 

प्रश्नपत्रिका २०० गुणांची असून, प्रश्नांचे स्वरुप वस्तुनिष्ठ ( ऑब्जेक्टिव्ह ) असेल . रीझनिंग ( 50 ), इंग्रजी (40 ), क्वांटिटेटिव्ह अॅप्टिट्यूड 
( 50), सामान्य ज्ञान ( विशेषतः बँकिंग संदर्भात ) ( 40 ), 
संगणक ज्ञान ( 20) अशी विषयवार गुणांची विभागणी आहे . 
परीक्षेचा कालावधी २ तासांचा आहे. लेखी परीक्षेत यशस्वी झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल. मुलाखतीसाठी १०० गुण असून, त्यामध्ये किमान 40 गुण ( राखीव वर्गासाठी 35 गुण ) मिळवणे आवश्यक आहे. 
उमेदवारांची निवड करताना लेखी परीक्षेतील गुणांना 80 टक्के वेटेज असेल, तर मुलाखतीतील गुणांना 20 टक्के वेटेज असेल. लेखी परीक्षा व मुलाखतीतील एकत्रित गुणांनुसार आय. बी. पी. एस. उमेदवारांची निवड करेल.
स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

No comments:
Write comments

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs