भारतीय आयुध निर्माणमध्ये महाराष्ट्रासह विविध राज्यात 7048 जागा
केंद्रीय संरक्षण मंत्रालय अंतर्गत भारतीय आयुध निर्माणमध्ये आयटीआय आणि नॉन आयटीआय उमेदवारांसाठी महाराष्ट्र (2186 जागा), ओरिसा (123 जागा), तामिळनाडू 1058 जागा), तेलंगणा (306 जागा), उत्तर प्रदेश (1337 जागा), उत्तराखंड (211 जागा), पश्चिम बंगाल (782 जागा), चंदीगड (49 जागा), मध्य प्रदेश (996 जागा) अशा एकूण 7048 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : नॉन आयटीआय - माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण
आयटीआय - मान्यताप्राप्त संस्थेतून संबंधीत ट्रेडमधुन आयटीआय परीक्षा उत्तीर्ण
वयोमर्यादा : 14 ते 22 वर्ष (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)
No comments:
Write comments