
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळात विविध पदांच्या 14253 जागा
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात चालक तथा वाहक (कनिष्ठ) (7929 जागा), लिपीक-टंकलेखक (कनिष्ठ) (2548 जागा), सहाय्यक (कनिष्ठ) (3293 जागा), पर्यवेक्षकीय (कनिष्ठ) (483 जागा) अशा एकूण 14253 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.
एकुण पदे : 14253
चालक तथा वाहक (कनिष्ठ) - 7929 जागा
लिपिक टंकलेखक (कनिष्ठ) - 2548 जागा
सहाय्यक (कनिष्ठ) - 3293 जागा
1) चालक तथा वाहक (कनिष्ठ) - माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परिक्षा (एस.एस.सी.) उत्तीर्ण तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालय (आर.टी.ओ.) यांचेकडील सार्वजनिक जड वाहन चालविण्याचा वैध परवाना, पी.एस.व्ही. बॅज (बिल्ला) प्रादेशिक परिवहन कार्यालय (आर.टी.ओ.) यांचेकडील वाहकाचा वैध परवाना व बॅज (बिल्ला)
2) सहाय्यक वाहतूक अधिक्षक (कनिष्ठ) - मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर, वाहतूक क्षेत्रातील कामाचा २ वर्षांचा अनुभव
3) वाहतूक निरीक्षक (कनिष्ठ) - मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर. वाहतूक क्षेत्रातील कामाचा 1 वर्षाचा अनुभव, एम.एस.सि.आय.टी.
4) लेखाकार (कनिष्ठ)/कनिष्ठ संग्रह पडताळक (कनिष्ठ) - मान्यताप्राप्त विद्यापीठातून बि.कॉम. पदवीधारक, लेखापाल कामाचा 1 वर्षाचा अनुभव, एमएससीआयटी
5) भांडार पर्यवेक्षक/वरिष्ठ संग्रह पडताळक - मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य अथवा विज्ञान शाखेचा पदवीधारक किंवा ऑटोमोबाईल/मेकनिकल इंजिनियरींग मधील पदवीका
6) भांडारपाल - मान्यताप्राप्त विद्यापीठाचा वाणिज्य अथवा विज्ञान शाखेचा पदवीधारक किंवा ऑटोमोबाईल/मेकनिकल इंजिनियरींग मधील पदवीका
7) सुरक्षा निरिक्षक (कनिष्ठ) - कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण
8) सहाय्यक सुरक्षा निरिक्षक (कनिष्ठ) - कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण
9) आगरक्षक - कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण, अग्निशमन पदविका
10) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) - स्थापत्य (सिव्हिल) अभियांत्रिकी पदवीका
11) कनिष्ठ अभियंता (विद्युत) - विद्युत (इलेक्ट्रीकल) अभियांत्रिकीमधील पदवीका
12) सहाय्यक कार्यशाळा अधिक्षक (कनिष्ठ)/तांत्रिक सहाय्यक (कनिष्ठ) - ऑटोमोबाईल/मेकनिकल अभियांत्रिकीमधील पदवीका
13) प्रभारक - ऑटोमोबाईल/मेकनिकल अभियांत्रिकीमधील पदवीका
14) वरिष्ठ संगणित्र चालक - मान्यताप्राप्त विद्यापीठाचा संगणकीय/माहिती तंत्रजान विषयातील पदवीधारक अथवा समकक्ष
पदनिहाय शैक्षणिक अहर्ता तसेच शारिरीक पात्रतेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहावी.
परीक्षा शुल्क : सर्वसाधारण (खुला) प्रवर्ग 500 रू. मागास प्रवर्ग 250 रू.
वयोमर्यादा : दि. 3/2/2017 रोजी वय 18 ते 38 वर्ष दरम्यान असावे. राखीव प्रवर्गांसाठी शासन निर्णयानुसार शिथिलक्षम
ऑनलाईन अर्ज भरण्याचा कालावधी
दि. 12 जानेवारी ते 11 फेब्रुवारी 2017
अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात आली आहे.
इतर शासकीय नोकरभरती जाहिराती
अर्ज भरण्याची मुदत वाढविण्यात आली आहे.


No comments:
Write comments