राज्य आदिवासी विकास विभागात सहयोगी पदाच्या जागा
राज्य शासनाच्या आदिवासी विकास विभागात राज्य आदिवासी विकास सहयोगी या पदाच्या (18) जागा भरण्यासाठी आवश्यक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.
शैक्षणिक अहर्ता : शासनमान्य विद्यापीठातून किमान 4 वर्ष कालावधीची कोणत्याही शाखेची पदवी. पदवीचा कालावधी 4 वर्षापेक्षा कमी असेल तर पात्रतेसाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदव्युत्तर पदवी. पदवी किंवा पदव्युत्तर पदवीमध्ये एकुण गुणांपैकी 50 टक्के गुण संपादन केलेले असावे.

अनुभव : उमेदवारास ग्रामिण किंवा आदिवासी भागामध्ये काम केल्याचा किमान 3 वर्षाचा अनुभव असावा. अनुभवाचा पुरावा म्हणुन कोणतेही शासकीय कार्यालय अथवा कोणतीही नोंदणीकृत संस्था, कंपनी, सोसायटी, ट्रस्ट यांच्या लेटरहेडवरील नियुक्ती आदेश अथवा अनुभव प्रमाणपत्र आवश्यक.
मानधन : एकुण मानधन 75,000 प्रति महिना
परीक्षा शुल्क : 350 रू.
वयोमर्यादा : दिनांक 1 ऑगस्ट 2016 रोजी किमान 21 वर्षे व कमाल 33 वर्षे. (अनुसुचित जाती/जमातीच्या उमेदवारांना कमाल वयोमर्यादेत 5 वर्षे सुट)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 जुलै 2016
No comments:
Write comments