केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध विभागात थेट भरती

 

केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध विभागात थेट भरती होणार आहे. यामध्ये लष्करी वैद्यकीय महाविद्यालयात महिला वैद्यकीय अधिकारी (2 जागा), संरक्षण मंत्रालयाच्या लष्करी उत्पादन विभागात वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी (2 जागा), पर्यावरण व वन मंत्रालयात सहायक पशुवैद्यकीय अधिकारी (1 जागा), सुचना व प्रसारण मंत्रालयाच्या भारतीय सूचना सेवेत वरिष्ठ ग्रेड (13 जागा), बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनमध्ये वैद्यकीय अधिकारी (20 जागा), वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या वस्त्रोद्योग आयुक्तालयात उपसंचालक (1 जागा), डॉ. बी. आर. आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, पोर्ट ब्लेयर येथे व्याख्याता-स्थापत्य (1 जागा), व्याख्याता-इलेक्ट्रॉनिक्स (1 जागा), व्याख्याता-इलेक्ट्रिकल (1 जागा), चंदीगड प्रशासनात सहायक अभियंता –स्थापत्य (15 जागा), पाँडेचरी शासनात आरोग्य व कुटुंब कल्याण संचालनालयात विशेषज्ञ-फॉरेन्सिक मेडिसिन (1 जागा), विशेषज्ञ - मायक्रोबायलॉजी (2 जागा), विशेषज्ञ – ऑर्थो-ईनटी (2 जागा), विशेषज्ञ – त्वचारोग (2 जागा), विशेषज्ञ - फिजिकल मेडिसीन (1 जागा), विशेषज्ञ - ऑप्थॉमॉलॉजी (2 जागा), विशेषज्ञ - ऑबस्ट्रेट अँड गायनाकॉलॉजिस्ट (2 जागा), विशेषज्ञ – ऑर्थोपेडिक (4 जागा), विशेषज्ञ –टर्बुक्युलेसिस (3 जागा), विशेषज्ञ - न्युक्लिअर मेडिसीन (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 3 जुलै 2014 
यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 14 जून - 20 जून 2014च्या अंकात प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.upsc.gov.inwww.upsconline.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 


No comments:
Write comments

Banking Exam Books

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs