हवामान विभागात वैज्ञानिक सहायक पदाच्या 1102 जागा

हवामान विभागात वैज्ञानिक सहायक पदाच्या 1102 जागा
स्टाफ सिलेक्शन कमिशनतर्फे हवामान विभागात वैज्ञानिक सहायक पदाच्या 1102 जागेसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक पात्रता : विज्ञान शाखेतील पदवी (भौतिक शास्त्र विषयासहित कॉम्प्युटर सायन्स/माहिती तंत्रज्ञान/कॉम्प्युटर अप्लिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरींगमध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदविका)
मान्यताप्राप्त पदवी किंवा पदविका प्रथम श्रेणीत (60%)
संबंधित पदवी किंवा पदवीका (10+2) नंतर 3 वर्षांचा अभ्यासक्रम असावा.
अर्जदार 10+2 भौतिक शास्त्र आणि गणित या विषयासह उत्तीर्ण असावा.

वयोमर्यादा : 4 ऑगस्ट 2017 पर्यंतचे वय 30 वर्षे असावे.
केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे अनुसूचित जाती/जमाती/इतर मागासवर्गीय/दिव्यांग/माजी सैनिक/केंद्र सरकारचे कर्मचारी यांना नियमाप्रमाणे वयात सुट.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 ऑगस्ट 2017
देशातील विविध राज्यात परीक्षा केंद्रे उपलब्ध असून महाराष्ट्रात विभागीय केंद्राअंतर्गत अहमदनगर, वडोदरा, राजकोट, सुरत, अमरावती, औरंगाबाद, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे आणि पणजी ही परीक्षा केंद्रे असणार आहेत. 
www.ssconline.nic.in

भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत विविध पदांच्या 313 जागा

 
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत विविध पदांच्या 313 जागा
भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत (ISRO) प्रशासकिय सहायक (272 जागा), उच्च श्रेणी लिपीक (02 जागा) आणि इस्त्रो अंतर्गत स्वायत्त संस्था आणि सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांसाठी सहायक (39 जागा) या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक पात्रता : कला/वाणिज्य/व्यवस्थापन/विज्ञान/संगणक या विषयात प्रथम श्रेणीसहीत पदवीधर असणे आवश्यक. शिवाय संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक.

वयोमर्यादा : 31 जुलै 2017 पर्यंत वय 26 वर्षे असावे. एस.सी/एस.टी. च्या प्रवर्गातील उमेदवारासाठी 31 वर्षे, ओबीसी प्रवर्गातील उमेदवारासाठी 29 वर्षे तर केंद्र शासनाचे कर्मचारी, माजी सैनिक, अपंग व्यक्ती, विधवा, विदुर, घटस्फोटित महिला (पुनर्विवाह न केलेली), पदक प्राप्त खेळाडू यांना भारत सरकारच्या नियमाप्रमाणे वयोमर्यादेत सुट मिळेल.

प्रशासकिय सहायक पदे : अहमदाबाद- (20), बंगळुरू (97), हैद्राबाद (27), नवी दिल्ली (04), श्रीहरिकोटा (35), तिरूवनंतपुरम (89). 
उच्च श्रेणी लिपीक पदे : बंगळुरू- (02) 
सहायक पदे- अहमदाबाद : (16), बंगळुरू (07), हैद्राबाद (01), नवी दिल्ली (14), तिरूवनंतपुरम (01). 

परीक्षा शुल्क : प्रत्येक पदासाठी शुल्क 100/-इंटरनेट बँकिंग/डेबिट कार्ड/किंवा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेत शुल्क भरता येणार आहे. 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2017

एअर इंडिया मध्ये महिलांसाठी कॅबिन क्रु पदाच्या 400 जागा

एअर इंडिया मध्ये महिलांसाठी कॅबिन क्रु पदाच्या 400 जागा
एअर इंडिया मध्ये महिलांसाठी प्रशिक्षित आणि प्रशिक्षणार्थी कॅबिन क्रु पदाच्या अनु.जाती 28 जागा, अनु.जमाती 19 जागा, इमाव 153 जागा, खुला 200 जागा अशा एकूण 400 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक पात्रता : किमान पदवी किंवा शासनमान्य संस्थेची हॉटेल मॅनेजमेंट/कॅटरींग/ट्रॅव्हल्स  टुरिझम विषयातील पदविका
शारिरीक अहर्तेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 1 ऑगस्ट 2017

पशुसंवर्धन विभागात विविध पदाच्या 138 जागा

पशुसंवर्धन विभागात विविध पदाच्या 138 जागा
महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागात पशुसंवर्धन पर्यवेक्षक, वरिष्ठ लिपीक, लिपिक टंकलेखक, लघुलेखक उच्चश्रेणी, लघुलेखक निम्नश्रेणी, वाहनचालक या पदांसाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

पशुसंवर्धन पर्यवेक्षक 114 जागा
शैक्षणिक पात्रता : दहावी परीक्षा उत्तीर्ण, पशुधन पर्यवेक्षक अभ्यासक्रम उत्तीर्ण.

वरिष्ठ लिपीक 10 जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी

लिपीक टंकलेखक 7 जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, मराठी 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि. वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण

लघुलेखक उच्च श्रेणी 1 जागा
शैक्षणिक पात्रता : दहावी परीक्षा उत्तीर्ण, इंग्रजी व मराठी 120 श.प्र.मि. लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण, मराठी 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि. वाणिज्य प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण.

लघुलेखक (निम्नश्रेणी) 1 जागा
शैक्षणिक पात्रता : दहावी परीक्षा उत्तीर्ण, इंग्रजी व मराठी 100 श.प्र.मि. लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण, 

वाहनचालक 5 जागा
शैक्षणिक पात्रता : दहावी परीक्षा उत्तीर्ण, वाहन चालविण्याच्या परवान्यासह 3 वर्षाचा अनुभव.

वयोमर्यादा : पदनिहाय वयोमर्यादेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 जुलै 2017

भारतीय संसदेत कनिष्ठ लिपीक पदाच्या जागा

भारतीय संसदेत कनिष्ठ लिपीक पदाच्या जागा
भारतीय संसदेत कनिष्ठ लिपिक (31 जागा) भरण्यासाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी, इंग्रजी/हिंदी टंकलेखन 40 श.प्र.मि.
वयोमर्यादा : 27 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 9 ऑगस्ट 2017

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये विविध पदांची भरती

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये विविध पदांची भरती
माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेडमध्ये मुख्य व्यवस्थापक (1 जागा), व्यवस्थापक (1 जागा), सहायक व्यवस्थापक (2 जागा), वरिष्ठ अभियंता (13 जागा), एक्झिक्युटीव्ह ट्रेनी (13 जागा) अशा एकूण 30 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक पात्रता 
मुख्य व्यवस्थापक (जनसंपर्क)/व्यवस्थापक (जनसंपर्क)/एक्झिक्युटीव्ह ट्रेनी (जनसंपर्क)
पात्रता : पदवी आणि पत्रकारिता पदवी/पदविका

सहायक व्यवस्थापक (प्रशासन)/एक्झिक्युटीव्ह ट्रेनी (प्रशासन)
पात्रता : एमबीए/पदव्युत्तर पदवी/पदविका

एक्झिक्युटीव्ह ट्रेनी (फायनान्स)
पात्रता : सीए किंवा सीएमए

वरिष्ठ अभियंता (ईलेक्ट्रिकल)
पात्रता : अभियांत्रिकी पदवी

वयोमर्यादा : पदनिहाय वयोमर्यादेच्या माहितीसाठी जाहिरात पाहा.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 जुलै 2017

Nabard राष्ट्रीय कृषी आणी ग्रामिण विकास बँकेत सहाय्यक व्यवस्थापक पदांची भरती

 
Nabard राष्ट्रीय कृषी आणी ग्रामिण विकास बँकेत सहाय्यक व्यवस्थापक पदांची भरती
राष्ट्रीय कृषी आणी ग्रामिण विकास बँकेत Nabard सहाय्यक व्यवस्थापक पदाच्या 91 जागांसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठाची किमान 50 टक्के गुणांसह पदवी (एससी/एसटी 45 टक्के) शैक्षणिक अहर्तेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा.

वयोमर्यादा : दिनांक 1 जुन 2016 रोजी किमान 21 व कमाल 30 वर्ष (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम)

परिक्षा शुल्क : खुला व ओबीसी प्रवर्ग 800 रू, एससी/एसटी/अपंग 150 रू.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 जुलै 2017

आयबीपीएस मार्फत ग्रामिण बँकेत सहाय्यक व अधिकारी पदाची महाभरती 14192 जागा

 
आयबीपीएस मार्फत ग्रामिण बँकेत सहाय्यक व अधिकारी पदाची महाभरती 14192 जागा
देशातील विवीध ग्रामिण बँकामध्ये कार्यालय सहाय्यक (मल्टीटास्कींग) 7374 जागा, आणी विवीध अधिकारी पदाच्या 6818 जागा अशा एकुण 14192 जागांसाठी आयबीपीएस मार्फत सामायीक परिक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

एकुण जागा 14192 जागा

1) ऑफिस असिस्टंट (मल्टीटास्कींग): 7374 जागा 
2) ऑफिसर्स-Scale I (सहाय्यक व्यवस्थापक): 4865 जागा
3) ऑफिसर्स-Scale II (कृषी अधिकारी): 169 जागा 
4) ऑफिसर्स-Scale II (जनरल बँकिंग ऑफिसर): 1395 जागा 
5) ऑफिसर्स-Scale II (माहिती तंत्रज्ञान अधिकारी):83 जागा 
6) ऑफिसर्स-Scale II (सनदी लेखापाल CA): 34 जागा 
7) ऑफिसर्स-Scale II (ट्रेझरी मॅनेजर): 11 जागा 
8) ऑफिसर्स-Scale II (विपणन अधिकारी): 33 जागा 
9) ऑफिसर्स-Scale II (कायदा अधिकारी): 21 जागा 
10) ऑफिसर्स-Scale III (वरिष्ठ व्यवस्थापक): 207 जागा 

शैक्षणिक पात्रता:  
पद 1,2 : मान्यताप्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी 
पद 3 : कृषी/फलोत्पादन/दुग्धशाळा/पशुसंवर्धन/वनीकरण/पशुवैद्यकीय विज्ञान/शेती अभियांत्रिकी/मत्स्यपालन पदवी, 02 वर्षे अनुभव
पद 4 : मान्यताप्राप्त विद्यापीठाची 50 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी, 02 वर्षे अनुभव
पद 5 : 50 % गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन/संगणक विज्ञान/माहिती तंत्रज्ञान अभियांत्रिकी पदवी, 01 वर्ष अनुभव
पद 6 : CA,  01 वर्ष अनुभव
पद 7 : चार्टर्ड अकाउंटंट किंवा एमबीए (Finance), 01 वर्ष अनुभव
पद 8 : एमबीए (Marketing), 01 वर्ष अनुभव
पद 9 : मान्यताप्राप्त विद्यापीठाची  50 % गुणांसह कायदा पदवी (LLB), 02 वर्षे अनुभव
पद 10 : मान्यताप्राप्त विद्यापीठाची  50 % गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी, 05 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : पदनिहाय वयोमर्यादेच्या सविस्तर माहितीसाठी जाहिरात पाहा. 

परिक्षा शुल्क : Rs 600/-  (SC/ST/अपंग/माजी सैनिक: Rs 100/-)

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 01 ऑगस्ट 2017
अर्ज भरण्याची प्रक्रीया 12 जुलै पासून सुरू होईल.

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत लिपिक पदांची भरती

महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत लिपिक पदांची भरती
महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनीत निम्नस्तर लिपिक (मांस) 3 जागा, निम्नस्तर लिपिक (लेखा) 3 जागा अशा एकुण 6 जागा भरण्यासाठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता धारण करणा-या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत.

शैक्षणिक पात्रता : कला/विज्ञान/वाणिज्य/व्यवस्थापन/प्रशासन पदवी, बि.कॉम व MS-CIT  

वयोमर्यादा : 13 जुलै 2017  रोजी 18 ते 38 वर्षे (राखीव प्रवर्गासाठी शासन नियमानुसार शिथिलक्षम. जाहिरात पाहा)

परिक्षा शुल्क : खुला प्रवर्ग Rs 500/-   मागासवर्गीय: Rs 300/-
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारिख 13 जुलै 2017 
loading...

Free सदस्य व्हा !

Popular Posts

Latest Jobs